Talegaon Dabhade: अनेकवेळा उद्घाटन होऊनही जांबवडे ते सुदवडी रस्ता 20 वर्षांपासून प्रलंबित, ग्रामस्थांचे निवेदन

Talegaon Dabhade: Despite repeated inaugurations, the road has been pending for 20 years, says jambvade sudvadi villagers गेल्या 20 वर्षांपासून अनेक वेळा अर्ज करुनही जाबंवडे व सुदवडी रस्ता प्रलंबित आहे.

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील जांबवडे ते सुदवडी रस्ता करण्याची गेल्या 20 वर्षांपासून मागणी होत आहे. आतापर्यंत अनेकवेळा रस्त्याच्या कामाचे उद्घाटन होऊनही प्रत्यक्षात रस्ता न झाल्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. रस्त्यात मोठे खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पाऊस सुरु होण्यापूर्वी रस्ता करावा अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.

ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे की, गेल्या 20 वर्षांपासून अनेक वेळा अर्ज करुनही जाबंवडे व सुदवडी रस्ता प्रलंबित आहे. अनेक वेळा या कामांचे उद्घाटन होऊन सुद्धा दरवर्षी या 700 मीटरच्या आवारात पावसाळ्याच्या आधी फक्त मुरूम टाकला जातो. या पलीकडे कोणतेही काम होत नाही.

दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावर चालत जाणेही मुश्किल होते. यापूर्वी अनेकवेळा तेथे गंभीर अपघात झाले आहेत. या 700 मीटर खराब रस्त्यामुळे ग्रामस्थांचे जीवन खालावले आहे.

या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे साथीचे आजार होत आहेत. त्यामुळे लोकांचे आरोग्य सुध्दा बिघडत आहे. त्यामुळे त्वरीत रस्ता करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.