Talegaon Dabhade: कलापिनी बालभवन केंद्र शाखेत आगळी वेगळी रंगपंचमी

एमपीसी न्यूज – दरवर्षी नवनवीन कल्पना राबवून मुलांना रंग खेळायला देत असतो. कॅन्व्हास पेंटींग, फेस पेंटींग, टॅटू, ठसे, चित्र रंगवणे. गेल्या वर्षी राॅक पेंटींग केले तर या वर्षी मुलांकडून मातीच्या पाॅट वर ब्रश आणी इयर बड्सच्या साह्याने रंगकाम केले. नवनवीन चित्र मुलांनी साकारली. पाने फुले, मासे, मुलांनी रंगकाम करता करता मनसोक्त रंगात खेळत होते. सारे रंग मुलांच्या चेहेर्‍यावर दिसत होते. हे सारे करता करता वेळेचे भान कोणालाच उरले नाही. सर्व प्रशिक्षकांनी सहकार्य करुन मुलांना आगळे वेगळी रंगपंचमी खेळण्यास मदत केली.

संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना वृषाली आपटे यांची होती. सहकारी प्रशिक्षिका मीरा कोण्णूर, आरती पोलावार, मनीषा शिंदे, गौरी कुलकर्णी, ज्योती ढमाले यांच्या सहकार्यामुळे सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या होऊ शकला आणि मुलांनी आनंदानी रंगपंचमी नाविन्यपूर्ण शिकता शिकता रंग खेळून साजरी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.