Talegaon Dabhade: युवा उद्योजक नवनाथ तानाजी पडवळ यांचे वतीने ५०० वाफेचे मशीन वाटप

एमपीसी न्यूज : माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियाना अंतर्गत लोकनेते आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त नवलाख उंबरे गावात युवा उद्योजक नवनाथ तानाजी पडवळ यांचे वतीने ५०० वाफेचे मशीन वाटप करण्यात आले.

 

यावेळी उपस्थित मावळ तालुक्याचे  आमदार सुनिल  शेळके, पुणे जिल्हा परिषद सदस्या  शोभा सुदाम कदम, पंचायत समितीच्या माजी सदस्या  ललिता कोतुळकर,नवलाख उंब्रे गावचे माजी सरपंच प्रभाकर पडवळ, संघटन मंत्री नारायण ठाकर, तालुका सरचिटणीस सुदाम कदम, उद्योजक अनिल मालपोटे , वराळेचे माजी सरपंच निलेश मराठे , माजी सरपंच हनुमंत कोयते , ग्रामपंचायत सदस्य  उषा नरवडे , माजी ग्रामपंचायत सदस्य  राजू पडवळ, सरचिटणीस  नवनाथ बळवंत पडवळ, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष नरवडे , तंटामुक्ती अध्यक्ष दिनकर नाना शेटे,  चेअरमन तानाजी पडवळ, रोहिदास पापळ, पै विशाल पडवळ, पैलवान राजू कडलक,अनिल नरवडे, करण उडाफे गुरुदेव घोलप , आकाश पडवळ , गावातील महिला भगिनी, वडीलधारी मंडळी व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार सुनिल शेळके यांनी कोरोनावर मात करण्याठी सर्वांनी स्व:ताची काळजी घ्या व घरीच रहा, सुरक्षित रहा असे आवाहन केले. व नवलाख उंबरे गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे असे आश्वासन देखील दिले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका सेवादल अध्यक्ष  जालिंदर शेटे व सुनील  शेटे यांनी केले. व तंटामुक्ती अध्यक्ष दिनकर नाना शेटे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.