TalegaonDabhade : आंदर मावळमधील 53 विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या शोभा सुदामराव कदम यांचे सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पुणे जिल्हा परिषद, महिला बालकल्याण समितीमधून टाकवे-वडेश्वर मतदारसंघातील आंबळे, निगडे आणि भोयरे या गावातील इयत्ता 5 वी ते 7 वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या 53 विद्यार्थींनीना सायकलींचे वाटप निगडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत करण्यात आले आहे.

यावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्या शोभा सुदामराव कदम, आंदर मावळ राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सुवर्ण चंद्रकांत घोलप, तालुका राष्ट्रवादी सरचिटणीस सुदामराव कदम, निगडेच्या सरपंच सविता बबुशा भांगरे, भोयरे गावचे सरपंच बळीराम भोईरकर, आंबळे गावचे सरपंच मोहन घोलप, माजी सरपंच भिकाजी भागवत, युवक राष्ट्रवादी सरचिटणीस माणिक तांबोळी, पोलीस-पाटील संतोष भागवत, उपसरपंच रामदास चव्हाण, माजी उपसरपंच गणेश भांगरे, सामाजिक कार्यकर्ते मारुती लक्ष्मण भांगरे, माजी सरपंच धोंडिबा भांगरे, तानाजी येवले, ग्रा. प. सदस्य गणेश भांगरे, ग्रामपंचायत सदस्य निलेश भागवत, ग्रामपंचायत सदस्य संभाजी भांगरे, भाऊ थरकूडे, मा. चेअरमन दादाभाऊ भांगरे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संतोष भांगरे, ग्रा.प सदस्य हनुमंत हांडे ,तिन्ही शालेय व्यवस्थापन समितीचे आध्यक्ष भरत आंभोरे, गोरख जांभुळकर, अर्चना भांगरे, उपाध्यक्ष राजश्री राजू खेंगले, आंबळे गावचे मुख्याध्यापक कांबळे, भोयरेचे मुख्याध्यापक विरनक, निगडेचे मुख्याध्यापक मस्तुद व सर्व शिक्षक तसेच विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिदेच्या शाळांना निधी कमी पडू देणार नाही. तसेच विद्यार्थ्यांची होणारी पायपीट थांबविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे, पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या शोभा सुदामराव कदम यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.