Talegaon Dabhade : अशोक काळोखे यांच्यातर्फे 750 विद्यार्थ्यांना मोफत दिनदर्शिका वाटप

एमपीसी न्यूज – ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिर (Talegaon Dabhade) येथे शालेय समितीचे सदस्य सामाजिक बांधिलकी जपणारे प्रसिद्ध उद्योजक अशोक काळोखे यांनी 750 विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन मोफत अमृत महोत्सवी वर्ष दिनदर्शिका वाटप केल्या. हा कार्यक्रम शुक्रवारी (दि. 16) ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिर येथे पार पडला.
नू.म.वि. प्र. मंडळाचे सहसचिव तसेच शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार शेलार, शालेय समितीचे सदस्य आनंद भेगडे तसेच पर्यावरण स्नेही संदीप पानसरे, मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांच्या शुभहस्ते दिनदर्शिकेचे वाटप झाले. याप्रसंगी मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच, प्रसिद्ध उद्योजक अशोक काळोखे यांनी मनोगतात दिनदर्शिकेचे महत्त्व विशद केले (Talegaon Dabhade) व शाळेत मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करा, हा महत्त्वाचा संदेश दिला.
नंदकुमार शेलार यांनीही मुलांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या ज्येष्ठ अध्यापिका रजनी बधाले यांनी केले. कार्यक्रमाची सांगता शाळेचे ज्येष्ठ अध्यापक शरद जांभळे यांच्या आभाराने झाली.