Talegaon Dabhade : ॲड. शलाका खाडंगे यांच्या स्मरणार्थ हॅप्पी स्टुडंट किटचे वाटप

एमपीसी न्यूज – कै.ॲड.कु.शलाका संतोष खाडंगे (Talegaon Dabhade) हिच्या स्मरणार्थ तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या सर्व प्राथमिक शाळेतील आर्थिक, दुर्बल घटकातील विद्यार्थांना हॅप्पी स्टुडंट किटचे वाटप करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखवळकर हे होते.तसेच रो.शीतल शाह ( DGN 22-23), आणि तळेगांव दाभाडे नगर परिषद शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे यांच्या शुभहस्ते व रो. मंगेश हांडे (डायरेक्टर फॉर लिटरसी), रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष रो. संतोष खाडंगे, अध्यक्ष रो. विन्सेंट सालेर, सचिव मिलिंद शेलार, उपाध्यक्ष राहुल खळदे, प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या वेळी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या शाळेतील 172 मुलांना रोटरी हॅप्पी स्टुडन्ट किट देण्यात आले.  रोटरी हॅप्पी स्टुडन्ट किटमध्ये स्कूल बॅग, टिफिन बाॅक्स, कंपास पेटी, वह्या आणि वॉटर बॅग हे साहित्य दिल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
कार्यक्रमात विद्यार्थी व मुख्याध्यापकांनी आपले मनोगत (Talegaon Dabhade) व्यक्त केले. त्या वेळी ॲड. विनय दाभाडे यांनी त्या प्रसंगी शलाकाच्या समरणार्थ स्वातंत्र्य संग्राम या महानाट्य कार्यक्रमाचे प्रथम प्रयोगाचे आयोजन करणार असल्याचे सांगितले.
प्रमुख पाहुणे शिल्पा रोडगे यांनी नगरपरिषदेच्या शाळेसाठी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीने जी मदत केली तशा स्वरूपाची मदत या पुढेही नगरपरिषदेच्या शाळांना आपण करावी असे आवाहन केले.
रोटरीचे मंगेश हांडे यांनी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीने अशा स्वरूपाचे विधायक कार्ये करावे त्यांना डिस्ट्रिक्ट 3131 नेहमीच मदत करेन असे सांगितले.

DGN शीतल शाह यांनी हॅप्पी स्टुडन्ट किट सोबतच लवकरच आम्ही मुलांसाठी स्टुडन्ट फिटनेस किटची संकल्पना राबिवणार असल्याचे सांगितले. त्यानंतर अध्यक्षीय मनोगत सुरेश साखवळकर यांनी कै.ॲड.कु.शलाकाच्या  आठवणी सांगून शाळेतील अनेक विध्यार्थीनी मुली शलाका सारख्या वकील होतील, त्या मुलींना आपण रोटरी क्लबच्या माध्यमातून मदत करावी असे सांगितले.
रो.विल्सेन सालेर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर प्रास्ताविक रो बाळासाहेब शिंदे यांनी केले.रो शंकर हदीमनी यांनी उपस्थितांचे आभार मानले .
सदर कार्यक्रमाला रो सचिन कोलवणकर, रो प्रवीण भोसले, रो संदीप मगर, रो अंतोष मालपोटे, रो विक्रम कलवडे, रो दीपक बागल, रो.मच्छिंद्र घोजगे, रो.योगेश शिंदे, रो पांडुरंग पोटे, रो अतुल पवार, रो सुवर्ण मते, रो.आश्रिता कोलवणकर, रो सुषमा गराडे व रोटरी मेंबर्स उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी, संचालक, सदस्य व संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले. सुत्रसंचालन सहप्रकल्प प्रमुख रो.लक्ष्मण मखर व रो.अनिल धर्माधिकारी यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.