Talegaon Dabhade :नवीन समर्थ विद्यालयाच्या स्नेहसंमेलनात मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नवीन समर्थ विद्यालयात सोमवारी (दि.२३) स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला.

अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संतोष खांडगे होते. विद्यार्थ्यांनी तयार केलेले हस्तकला दालन, रांगोळी दालन,विज्ञान दालनचे आणि हस्तलिखित निरांजनचे उदघाटन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

संमेलनाचे उदघाटन विलास काळोखे यांनी केले.विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. नवनव्या उपक्रमातून विष्णू गणेश पिंगळे या नावाने देण्यात येणारा क्रांतीरत्न विद्यार्थी पुरस्कार इंद्रायणी ठाकूर या विद्यार्थीनीला देण्यात आला.

आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या कैलास पारधी, बाबाराव आंभोरे, रेवाप्पा शितोळे, योगेश पाटील, विवेक भगत, गंगाराम खंडागळे, संजय कसाबी प्रभा काळे आणि गुणवंत विद्यार्थी यांचा मान्यवरांचे हस्ते सन्मान करण्यात आला.

मकरंद टिल्लू यांनी हास्याचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष खांडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, सुरेश शाह, महेश शाह, डाॅ.शाळीग्राम भंडारी, शैलेश शाह, दामोदर शिंदे, सोनबा गोपाळे, अ‍ॅड. श्रीराम कुबेर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग पोटे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय कसाबीसह सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.