Talegaon Dabhade : तळेगाव येथे विहार सेवकांचा विभागीय मेळावा

एमपीसी न्यूज – तळेगाव येथील श्री पार्श्व प्रज्ञालय तीर्थ (Talegaon Dabhade) येथे रविवारी (दि. 15) विहार सेवकांचा विभागीय मेळावा पार पडला. यात जैन आचार्य अभय शेखर सुरीश्वरजी महाराज यांनी उपस्थितांना संबोधित केले. साधुसंत हे राष्ट्राची अनमोल संपत्ती आहे. तो ठेवा आपण जपून ठेवला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले.

मावळ तालुका व पिंपरी चिंचवड या विभागीय विहार सेवकांच्या मेळाव्या प्रसंगी गुरु महाराज बोलत होते. मावळ तालुका व पिंपरी चिंचवड भागातील विहार सेवकांचे कार्य हे कौतुकास्पद आहे. रोज पहाटे चार वाजता उठून साधू संतांबरोबर त्यांना सुरक्षा प्रदान करणे व त्यांचा योग्य स्थळी विहार करण्यासाठी मदत करणे हे अवघड असे कार्य हे सर्व विहार सेवक मंडळी करीत आहेत. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आमचा विहार सुरक्षित व्हावा, म्हणून ही सर्व मंडळी कौतुकास्पद असे कार्य करीत आहे व आम्हाला सुरक्षा पूर्वीत आहे. या सर्व सेवकांचे करू तेवढे कौतुक कमीच आहे.

परमपूज्य मुनिराज जयभानु सुरिश्वजी महाराज यांनी आपल्या मनोगतामध्ये विहार सेवकांनी (Talegaon Dabhade) केलेल्या आजपर्यंतच्या कामाचा आढावा घेतला व आज आयोजित केलेल्या विभागीय मेळावा श्री कीर्तीभाई सिंघानी यांनी आयोजन केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

आजच्या विभागीय मेळाव्यासाठी 240 विहार सेवक मावळ तालुका व पिंपरी चिंचवड परिसरातून उपस्थित होते. या मेळाव्याचे उत्कृष्ट नियोजन सुरेशभाई दोशी, राकेश ओसवाल, अरविंदभाई कटारिया व भद्रेश भाई शहा यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.