Talegaon Dabhade : सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर दाभाडे यांचे निधन 

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील शेतकरी कुटुंबातील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर कोंडीबा दाभाडे (वय 79) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. 

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, सून, पाच बंधू, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. ते पिंपरी येथील जे जे ग्लास कंपनीत नोकरीस होते.

उद्योजक तुषार दाभाडे यांचे वडील तर सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन आण्णासाहेब दाभाडे यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.

तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील बनेश्वर स्मशानभूमीत उद्या रविवार (दि.10) सकाळी दहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.