Talegaon Dabhade : श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना 11 टक्के लाभांश

एमपीसी न्यूज- श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी (दि. 30) संस्थेच्या सभागृहात पार पडली.
या वर्षी संस्थेने सभासदांना ११ टक्के लाभांश जाहीर केला.

पतसंस्थेचेच्या वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक बबनराव भेगडे होते. यावेळी खजिनदार निलेश राक्षे, उपाध्यक्ष राहुल पारगे, रजनीताई भेगडे, गोरख काकडे, मिथिलेश धोत्रे, सल्लागार महेशभाई शहा व सर्व संचालक मंडळ व संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपथित होते.

यावेळी प्रमुख वक्ते प्रमोद बोऱ्हाडे ( शिवव्याख्याते ) यांनी शिवकालीन अर्थसंकलप या विषयावर आपले विचार मांडले. महिला सक्षमीकरण व महिला बचत गट या विषयावर नगरसेवक संतोष भेगडे यांनी आपले विचार मांडले व संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली.

यावेळी रघुवीर शेलार यांची देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, गणेश आल्हाट यांची माळवाडी ग्रामपंचायत उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल, विशाल मराठे यांची वराळे ग्रामपंचायत उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल, अजित गोपाळ शेलार यांची भारतीय मजदूर संघ अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, महेश उर्फ राजू विलास शिंदे यांची तळेगाव ऑर्डनन्स डेपो जे.सी .एम च्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल तसेच मंगलदीप महिला बचत गटाने स्वयंरोजगार महिला बचत योजनेत सक्रिय सहभाग दिल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आले.

प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष शरद भोंगाडे यांनी केले. अहवाल वाचन सचिव सतीश भेगडे यांनी केले. आभार डॉ .शाळीग्राम भंडारी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.