Talegaon Dabhade : डॉ. स्नेहा तारे यांनी मिसेस मावळ तर जान्हवी आंबेकर मिस मावळ

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ मावळ व मावळ एकता कला मंच (Talegaon Dabhade) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त मिसेस मावळ आणि मिस मावळ या स्पर्धा घेण्यात आल्या. डॉ. स्नेहा तारे यांनी मिसेस मावळ तर जान्हवी आंबेकर हिने मिस मावळ हा किताब पटकावला. तसेच मावळ तालुक्यातील सफाई कर्मचारी, आरोग्य सेविका, होप फाउंडेशन फॉर चिल्ड्रन्सच्या अंगणवाडी शिक्षिका, पोलीस अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या 50 महिलांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात मावळ तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

या सोहळ्यासाठी प्रसिद्ध अभिनेते किरण गायकवाड यांच्यासह शिरगाव -परंदवडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ, जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे, तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे, माजी पंचायत समिती सभापती निकिता घोटकुले यांच्यासह ए.जी.रो.शंकर हादीमणी, रो. मंगेश गारोळे, रोटरी सिटीचे अध्यक्ष रो.दीपक फल्ले, लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.मयूर रजगुरव,रो.मनोज ढमाले, रो. प्रशांत भागवत, रो.रवी घारे,रो.संतोष शेळके, रो.दिलीप पारेख,रो.सुरेश शेंडे, रो.अनिल धर्माधिकारी, रो.दशरथ जांभूळकर, रो.गुणवंत जाधव, रो.रुपेश चव्हाण, रो.श्रीधर चव्हाण, रो.संतोष आवटे, रो.डॉ.रोहित मिनियार, रो.प्रदीप टेकवडे, रो.प्रदीप मुंगसे, रो.संजय वाघमारे, रो.सुनंदा वाघमारे, रो.शरयू देवळे, रो.डॉ.धनश्री काळे, तळेगाव शहरातील ज्येष्ठ पत्रकार विलास भेगडे, अमीन खान, अंकुश दाभाडे, मनोहर दाभाडे, प्रमोद देशक, राजेश बारणे, महेश भागीवंत यांच्यासह तळेगाव शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेचा माजी नगराध्यक्षा वैशाली दाभाडे, तळेगाव नगर परिषदेच्या उपमुख्यअधिकारी सुप्रिया शिंदे, प्रशासकीय अधिकारी शिल्पा रोडगे, लायन्स क्लबच्या माजी झोनल चेअरमन ला.प्रमिला वाळुंज, राष्ट्रवादीच्या तळेगाव शहर अध्यक्षा शैलजा काळोखे,रोटरी सिटीच्या उपाध्यक्षा रो.शाहीन शेख आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

दि 4 मार्च रोजी सुशीला मंगल कार्यालय लिंब फाटा तळेगाव दाभाडे येथील रोटरी क्लब ऑफ मावळ व मावळ एकता कला मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिनानिमित्त मिसेस मावळ व मिस मावळ या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमामध्ये मावळ तालुक्यातील सफाई कर्मचारी,आरोग्य सेविका, होप फाउंडेशन फॉर चिल्ड्रन्सच्या अंगणवाडी शिक्षिका,पोलीस कर्मचारी अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या पन्नास महिलांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.तसेच महिलांसाठी प्रेरणादायी असणाऱ्या अशा आठ महिलांना रोटरी क्लब ऑफ मावळ व मावळ एकता कला मंच यांच्या वतीने प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ मावळचे अध्यक्ष रो. दीपक चव्हाण,उपाध्यक्ष रो.नितीन घोटकुले, सचिव रो.दत्तात्रय सावंत व प्रकल्प प्रमुख रो.सुनील पवार यांच्यासह मावळ एकता कला मंच तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष रो.रेश्मा फडतरे व संस्थापक सागर शिंदे यांनी केले होते.

अत्यंत चुरशीच्या अशा मिस मावळ व मिसेस मावळ (Talegaon Dabhade) या स्पर्धेचे परीक्षण ॲड.पूनम ढोरे, पुष्पांजली जैन व श्रद्धा पारते यांनी केले.

Talegaon Dabhade : सलग आठ तास परिश्रमातून रांगोळीतून साकारली जिजाऊंची प्रतिमा

पाहुण्यांचे स्वागत सागर शिंदे यांनी तर प्रास्ताविक रो. दीपक चव्हाण यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख रो. रेश्मा फडतरे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय कुलकर्णी यांनी केले आणि आभार रो. दत्तात्रय सावंत यांनी मांनले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर आवारे, गोधाम इको व्हिलेज, नम्रता स्टोन क्रशर, काळोखे पाईप्स, राठोड ज्वेलर्स, कै.नारायणराव काळोखे नागरी सहकारी पतसंस्था, समर्थ कन्स्ट्रक्शन, ढमाले दूध, मावळ फ्रेश आदींनी योगदान दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.