Talegaon Dabhade: पाले पठार, पाले नामा येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

मावळ पठार सुविधा समितीच्या वतीने विहीरीच्या कामाचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज – मावळ विचार मंच संचलित मावळ पठार सुविधा समितीच्या वतीने बुधवारी (१ मे) महाराष्ट्र दिन आणि संस्थेचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून डोंगर पठारावरील वनवासी बांधवांच्या आणि पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी बांधण्यात येणाऱ्या विहीरीच्या कामाचे भास्करराव म्हाळसकर यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. हा कार्यक्रम पाले पठार, पाले नामा येथे पार पडला.

अध्यक्ष कल्पेश भोंडवे यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. ज्यात त्यांनी या प्रकल्पाचा स्थानिक गरजू नागरिकांना, त्यांना त्यांच्या आणि मूक जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, असे सांगितले.

  • यावेळी संस्थापक-अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर मनोगत व्यक्त करताना म्हणाले, काही दिवसांपूर्वी पठारावर करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांसाठी ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यातूनच संकलित करण्यात आलेला निधी या पठार सुविधेसाठी वापरण्यात येणार आहे. तसेच हा प्रकल्प पुढील एक महिन्यात पूर्ण होईल, असे सांगितले.

याप्रसंगी मावळ विचार मंचाचे संस्थापक देवराई संस्थेचे अध्यक्ष गिरीष खेर , मावळ पठार सुविधा समितीचे पदाधिकारी किरण भिलारे, भूषण मुथा, अतुल राऊत ,नामदेव वारींगे,संदीप म्हाळसकर,अतुल म्हाळसकर, योगेश म्हाळसकर ,जेष्ठ नेते सोमनाथ काळे, विठ्ठलराव घारे, नामदेव आखाडे व पठारावरील नागरीक व महिला भगिनी उपस्थित होत्या.

  • आभार प्रदर्शन यावेळी प्रकल्प प्रमुख अनंता कुडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.