Talegaon Dabhade : आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्यामुळे दारुंब्रे-चांदखेडच्या शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न लागला मार्गी लागला. त्यामुळे दारुंब्रे-चांदखेडमधील शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी मिळणार आहे. याबाबत शेतकऱ्यांनी आमदार शेळके यांचे आभार मानले.

कुसगाव धरणातून येणाऱ्या डाव्या कालव्यातून येणारे पाणी दारुंब्रे-चांदखेडमधील शेतकऱ्यांना येत असते. परंतु ते गळती होत असल्याने, त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होत नव्हते, ही गैरसोय शेतकऱ्यांनी स्थानिक आमदार सुनील शेळकेंच्या निदर्शनास आणून दिली. आमदारांनी तात्काळ पाटबंधारे विभागाचे अधिकारी लाटे यांना कालवा सफाईचे आदेश दिले व त्यांनी ही संबंधित अधिकाऱ्यांना अंमलबजावणीचे कार्यवाही करण्यास सांगितले व यंत्रसामग्री पाठवून दिली.

या कामाच्या शुभारंभा वेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक पठारे, संचालक सुभाषराव राक्षे, अजिंक्य टिळे, माजी उपसरपंच सोमनाथ इंगळे, ग्रामपंचायत सदस्य शरद शिंदे, इंगवले साहेब,पांडुरंग गायकवाड, आबा गायकवाड, दिनेश गायकवाड, चंद्रकांत गायकवाड,आयुब इनामदार, अरुण गायकवाड, हनुमंत गायकवाड, रामहरी गायकवाड, संतोष गायकवाड, अमित कदम, गणेश आगळे, इत्यादी स्थानिक शेतकरी उपस्थित होते .

कालवा सफाईमुळे ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांची चिंता दुर होणार आहे. यासाठी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले व सर्व संचालक मंडळाने शेतकरी बांधवांनी आमदार शेळके यांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like