Talegaon Dabhade : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये अभियंता दिन साजरा

एमपीसी न्यूज : नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ (Talegaon Dabhade) आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित नूतन अभियांत्रिकीमध्ये अभियंता दिन साजरा झाला. सर श्री विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यानिमित्त गुणवंत शिक्षकांचा तसेच उत्तम कामगिरी करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी आनंद महले ग्रुपचे प्रकल्प प्रमुख अभय भेंडे आणि सहाय्यक व्यवस्थापक समीर देशमुख तसेच नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.विलास देवतारे, सर्व विभागप्रमुख डॉ.नितीन धवस, डॉ.विनोद किंबहुने, डॉ.शेखर राहणे, डॉ.नितीन शेरजे, डॉ. सागर जोशी प्रबंधक विजय शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.

अभियंता दिनाचे औचित्य साधत विविध विषयांमध्ये शंभर टक्के निकाल लागलेल्या विषय शिक्षकांचा तसेच महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासात चांगले कार्य करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

Water Supply : उद्या पुण्यातील ‘या’ भागातील पाणी पुरवठा असणार बंद

“विद्यार्थी हा केंद्रस्थानी ठेऊन शिक्षक हा नेहमी विद्यार्थी घडवत (Talegaon Dabhade) असतो, विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्ती आणि गुणप्राप्ती दोन्ही मिळवून देत असतो. विद्यार्थी दशेतच विद्यार्थ्याची भविष्य निर्मिती करत असल्यामुळे शिक्षण हा सर्वात महत्त्वाचा घटक असून सर्व शिक्षक हे मोलाचे काम करत आहे,” असे भेंडे यांनी याप्रसंगी मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुषमा भोसले आणि कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ. नितीन धवस यांनी व्यक्त केले. डॉ. सागर जोशी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.