BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : मावळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या तज्ञ संचालकांची निवड जाहीर

एमपीसी न्यूज – मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालकपदी सतिश धोंडीबा तुमकर, पांडुरंग भगवान गराडे, मधुकर रतिकांत जगताप यांची निवड झाली आहे.

मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दत्तात्रय केदारी आणि उपाध्यक्ष रोहिदास गराडे यांनी कामशेत येथे संघाच्या कार्यालयात आज झालेल्या मासिक बैठकीत सतिश धोंडीबा तुमकर, पांडुरंग भगवान गराडे, मधुकर रतिकांत जगताप यांची तज्ञ संचालक म्हणून निवड जाहीर केली.

यावेळी संचालक प्रकाश पवार, पंढरीनाथ ढोरे, दत्तात्रय शिंदे, खंडू जाधव, बाळासाहेब ढोरे, रवींद्र घारे, बाळासाहेब पवार, ज्ञानेश्वर गोणते, चंद्रभागा तिकोणे, मनिषा आंबेकर, भाऊसाहेब मावकर आदी उपस्थित होते.

  • सर्व संचालकांच्या उपस्थितीत या तिन्ही मान्यवरांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

याबाबत माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान संचालक पंढरीनाथ ढोरे यांनी सांगितले की, गोडावूनचे जीर्ण झालेले पत्रे बदलून रंगरंगोटी करून चार गोडावून भाड्याने दिलेली आहेत. त्यामुळे संघाला उत्पन्नाचे साधन झाले आहे. अनेक वर्षे 28 गुंठे जागा सरकारच्या नावाने होती. आताच्या संचालक मंडळाने नजराणा भरून ती जागा संघाच्या नावाने करून घेतली आहे. आता चांगल्या स्थितीत संघ येत आहे.

सतीश तुमकर
पांडुरंग गराडे
मधुकर जगताप
.