Talegaon Dabhade : बधलवाडी येथील शेतकऱ्यांनी जाणून घेतले सगुना राईस तंत्रज्ञान

कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी हरभरा प्रकल्प अभ्यास दौरा

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील बधलवाडी (नवलाखउंब्रे) येथील शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत आयोजित केलेल्या हरभरा प्रकल्प अभ्यास दौऱ्यामध्ये सगुना राईस तंत्रज्ञानाबद्दल (एसआरटी) माहिती घेतली.

सहाय्यक कृषी अधिकारी पी. एस.पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी अभ्यास दौरा पार पडला. पुसाणे, शिळींब, तुंग येथे सगुना राईस तंत्रज्ञान (एसआरटी) अंतर्गत या शेतकर्‍यांनी हरबरा,काकडी, दोडका, कारली, मिरची, टोमॅटो, स्ट्रॉबेरी, गहु, घेवडा, फरसबी, मसूर,वाल, ही पिके एसआरटी पद्धतीने कशी घेतली जातात याची माहिती घेऊन या पद्धतीने केलेली लागवड पहिली. तसेच कृषी पर्यटन केंद्र शिळींब येथे भेट दिली. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी नवीन बोराडे यांनीं एसआरटी बद्दल मार्गदर्शन केले..

यावेळी कृषीमित्र अनिल बधाले, नितीन बधाले, गबाजी दहातोंडे, दशरथ बधाले, राजु बंधारे, ज्ञानेश्वर दहातोंडे, कोंडिबा दहातोंडे, भरत जाधव, पाटील बुवा गावडे, शंकर बधाले, संभाजी बधाले व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.