Talegaon Dabhade : ‘फार्शस्पिलेर्न अकॅडमी’चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

एमपीसी न्यूज – फार्शस्पिलेर्न अकॅडमीचे वार्षिक स्नेहसंमेलन येथील कलापिनी सांस्कृतिक केंद्रात विविध कार्यक्रमांनी नुकतेच उत्साहात पार पडले. आय. बी. एम. आर. कॉलेजचे  संस्थापक अध्यक्ष एन. सी जोशी व  प्रा. शिरीष अवधानी,फार्शस्पिलेर्न अकॅडमीचे विश्वस्त श्रीधर वळवडे, ऋचा वळवडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी भारतीय नृत्य ,नाट्य,लोकनृत्य,जर्मन भाषेतील समूहगान,पाश्चिमात्य नृत्य,युरोपच्या धरतीवरील गाणी सादर केली.

इंडो-जर्मन संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमास विद्यार्थी व पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.यावेळी युरोप दौरा करताना आवश्यक असणाऱ्या गोष्टींचे सादरीकरण करण्यात आले.एन. सी. जोशी, शिरीष अवधानी यांच्या हस्ते’युरोप स्टडी टूर २०१९’या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.जर्मनीची खानपान व्यवस्था, राहणीमान, ऋतुचक्र, दैनंदिनी, नैसर्गिक आणि ऐतिहासिक ठिकाणे यावर प्रकाशझोत टाकण्यात आला.

जोशी व अवधानी यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले. श्रीधर वळवडे  यांनी स्वागत केले. ऋचा वळवडे यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2