Talegaon Dabhade : तळेगावात 20 ते 22 ऑक्टोबर रोजी प्रथमच राज्य मानाकन कॅरम स्पर्धा

एमपीसी न्यूज- नगरसेवक सुनील शंकरराव शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव दाभाडे येथे प्रथमच राज्य मानाकन कॅरम स्पर्धा होणार आहेत. ही स्पर्धा लायन्स क्लब कडोलकर कॉलनी येथे 20 ते 22 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या स्पर्धेत स्त्री व पुरुष मिळून 500 स्पर्धक भाग घेणार आहेत

या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे, दोन वेळा जगजेत्ता राहिलेला मुंबईचा प्रशांत मोरे, उपविजेता रियाज़ अकबरअली, माजी विश्वविजेता योगेश परदेशी, अग्र मानांकित महमद गुफरान, विकास धारिया, प्रकाश गायकवाड़, संदीप देवरुखकर, अनिल मुंढे, अभिजीत त्रिपनकर तसेच महिला गटात काजल कुमारी आयेशा महम्मद नीलम घोडके यांचा खेळ पाहता येणार आहे. या स्पर्धेसाठी करंडक आणि एकूण एक लाख 10 हजारांची परितोषिके ठेवण्यात आली आहेत.

या स्पर्धेसाठी मोहर प्रतिमा या तळेगावातील मोठ्या बांधकाम प्रकल्पाने प्रयोजकत्व स्वीकारले आहे असे कॅरम असोसिएशन ऑफ़ पुणेचे सदस्य सुदाम दाभाडे यांनी सांगितले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.