Talegaon Dabhade : फ्लफीचे फ्रेश चिकन, मटण अन मासे आता मिळणार तळेगावात; खाद्यप्रेमींसाठी मोठी पर्वणी

एमपीसी न्यूज – कुठलंही, काहीही, कसलंही पुण्यात खपत (Talegaon Dabhade) नाही. इथले ग्राहक, प्रेक्षक आणि खाद्यप्रेमी अत्यंत चोखंदळ आहेत. त्यामुळेच ग्राहकांच्या चोखंदळपणाची काळजी घेणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकाला ग्राहक यशाच्या शिखरावर पोहोचवतात. खाद्यप्रेमींच्या चोखंदळपणाची जाणीव ठेऊन तळेगावमध्ये फ्लफी फूड प्रा. लि. चे फ्रेश चिकन, मटण आणि मासे मिळण्याची सोय केली जात आहे.

फ्लफीच्या तळेगाव शाखेचे उद्घाटन रविवारी (दि.10) सायंकाळी 6:00 वाजता, भगत चेंबर, शर्मा बेकरी जवळ, तळेगाव स्टेशन येथे प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत हिच्या हस्ते होणार आहे.

Talawade : तळवडे फायर कॅडल कंपनीतील आग प्रकरणी एकाला अटक तिघांवर गुन्हा

संस्कृती जपणारं आपलं पुणे खाद्य संस्कृतीत पण काही मागे नाही..! पुणे आता खवय्यांचे त्यातल्या त्यात नॉनव्हेजप्रेमींचं हक्काचं माहेरघर होत आहे. पण यात तुम्हाला (Talegaon Dabhade) पुरवले जाणारे मासे, चिकन व मटण यांच्या गुणवत्तेबाबत तुम्ही विचार केलाय का? जर तसा विचार करत असाल तरच तुम्ही चोखंदळ खाद्यप्रेमी आहात. तुमची हीच गरज आता फ्लफी पूर्ण करणार आहे. तळेगाव दाभाडे येथे पुण्यातले सगळ्यात पहिले गुणवत्तापूर्ण चिकन, मटण व मासे पुरवणारे आउटलेट सुरू होतंय.

दक्षिण भारतातील ही संकल्पना पुण्यामध्ये प्रथम तळेगाव दाभाडे येथे येत आहे. हाइजेनिक, शुध्द, ताजे चिकन, मटण, मासे तसेच रेडी टू ईट मरीनेडचे विविध प्रकार, उत्तम क्वालिटी, गुणवत्तापूर्ण सेवा, होम डिलीव्हरीची सोय असलेल्या फ्लफीला भेट द्या आणि आपली दर्जेदार आणि चविष्ट मांसाहाराची भूक भागवा.

उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे, ज्येष्ठ उद्योगपती रामदास आप्पा काकडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, सत्यशील राजे दाभाडे सरकार, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कामराज आदी उपस्थित राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.