Talegaon Dabhade : दहीहंडी उत्सवात कायदा सुव्यवस्था राखा ; तळेगाव दाभाडे पोलिसांचे आवाहन

एमपीसी न्यूज- यंदाच्या दहीहंडी उत्सवात डॉल्बीचा वापर टाळा, दहीहंडी पथकाचा विमा उतरवा, सुसज्ज रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करा आणि कायदा आणि सुव्यवस्था राखा अशा सूचना पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी केले. तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे मंगळवारी (दि. 28) दहीहंडी मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान त्या बोलत होत्या.
या बैठकीला सहायक पोलीस आयुक्त दहूरोड विभाग श्रीधर जाधव, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे तसेच तळेगाव दाभाडे येथील दहीहंडी उत्सव मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत दहीहंडी उत्सव काळात येणाऱ्या अडचणी बाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. यंदाच्या दहीहंडी उत्सवात डॉल्बीचा वापर टाळा, दहीहंडी पथकाचा विमा उतरवा, सुसज्ज रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करा आणि कायदा आणि सुव्यवस्था राखा अशा सूचना करण्यात आल्या. दहीहंडी परिसरात CCTV कॅमेरे बसविल्यास अनुचित प्रकार रोखण्यासाठी मदत होईल असेही सांगण्यात आले.