Talegaon Dabhade : खाद्य महोत्सवास सुरुवात; तळेगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्युज – इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे व मेधावीण फाउंडेशन आयोजित खाद्य महोत्सव प्रदर्शन व विक्री या उपक्रमाला उत्साहात सुरुवात झाली. (Talegaon Dabhade) महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे गुरुजी, रुडसेटचे संचालक प्रवीण बनकर यांच्या हस्ते झाले. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तळेगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संकल्प महिला सक्षमीकरणाचा, सन्मान आपल्या संस्कृतीचा या ब्रिदांतर्गत हा उपक्रम राबविला जात आहे.

उद्घाटन प्रसंगी पत्रकार प्रभाकर तुमकर,महादेव वाघमारे, नगरपरिषदेच्या विभा वाणी, वैशाली चव्हाण, मेधावीण फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा मंगल भेगडे, सचिव स्वाती दाभाडे, निशा पवार, रेणुका जाधव, माया भेगडे, जयश्री दाभाडे,ममता मराठे,मंगल पवार,साधना काळोखे,मीरा बेडेकर, डॉ लता पुणे,ज्योती जाधव,नवनीता चॅटर्जी,संगीता शेडे,ज्योती पाटील व इतर सदस्य उपस्थित होते.

 

Moshi News :  टोल वसुली तात्काळ बंद करा  – मोढवे

या खाद्य महोत्सवात उकडीचे मोदक,सुरुळीच्या, कोथंबिरीच्या वड्या,जैन व भाजणीचे थालीपिट,विदर्भ पाणी पुरी, मांडे, मासवडी, चिकन थाळी, खिमा, माश्यांचे विविध खाद्य प्रकार, कोल्हापुरी व्हेज-नॉनव्हेज प्रकार, फास्ट फूड, ज्यूस, सँडविच, फ्लॉवर सेट, साड्या, ड्रेस,ज्वेलरी,विविध मेकअप चे सामान, सैनिकी शिक्षण मार्गदर्शक असे शहरी तसेच ग्रामीण भागातील महिला भगिनींनी लावलेले 40 पेक्षा जास्त स्टॉल आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या दिवशीचा प्रतिसाद या महीला घेत असलेल्या कष्टाला ऊर्जा देणारा होता,

6,7,8 जानेवारी असा तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळेल असा विश्वास अध्यक्षा वैशाली दाभाडे, प्रोजेक्ट चेअरमन हेमलता खळदे व (Talegaon Dabhade) अर्चना देशमुख यांनी व्यक्त केला. कल्ब सदस्यांनी देखील प्रत्येक स्टाॅलवर जाऊन खरेदी करत खाद्य पदार्थाचा आस्वाद घेत दिमाखदार सुरुवात करून दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.