Talegaon Dabhade: रा. स्व. संघाचे माजी तालुका संघचालक विनोद मेहता यांचे निधन

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मावळचे माजी तालुका संघचालक विनोद रमणलाल मेहता (वय 58) यांचे आज (सोमवारी) दुपारी चारच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. 

विनोद मेहता यांच्या मागे पत्नी, एक भाऊ, दोन बहिणी व दोन मुलगे असा परिवार आहे. विनोद मेहता यांच्या पार्थिवावर संध्याकाळी बनेश्वर स्मशानभूमीत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देशात कोरोना संकटामुळे लॉकडाऊन सुरू असल्याने कोणीही अंत्यदर्शनासाठी अथवा अंत्यसंस्कारासाठी गर्दी करू नये, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

विनोद मेहता हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक होते. संघाच्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या होत्या. उद्योगधाम व गुरुजी न्यास या संघ परिवारातील संस्थांचे ते विश्वस्त होते. कलापिनीच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी काही काळ सांभाळली होती. वैष्णव समाज बालाजी ट्रस्टचेही ते विश्वस्त होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.