मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Talegaon-Dabhade fraud : नफ्याचे आमिष दाखवत महिलेची 72 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज : गुंतवणुकीत मिळणाऱ्या नफ्याचे आमिष दाखवून महिलेची 72 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. (Talegaon-Dabhade fraud) हा प्रकार 1 डिसेंबर 2021 ते 14 सप्टेंबर 2022 या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडली.

राजू शाळीकराम ढोरे (वय 42, रा. तळेगाव दाभाडे. मूळ रा. वाशीम), विकी ढोरे (वय 22, रा. उल्हासनगर), अक्षय ज्ञानेश्वर डांभरे (वय 25, रा. यवतमाळ) आणि एक महिला (वय 40) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

TB Free India Mission : क्षयरोग नष्ट करण्यासाठी लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा – डॉ.लक्ष्मण गोफणे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून कंपनीत गुंतवणूक केल्यास जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. (Talegaon-Dabhade fraud) त्यातून फिर्यादी महिलेची आरोपींनी 72 लाख रुपयांची फसवणूक केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

 

Latest news
Related news