Talegaon Dabhade: ‘कोरोना लॉकडाऊन’च्या आपत्तीत चार हजार कुटुंबांना महिनाभरासाठी मोफत शिधावाटप

एमपीसी न्यूज- कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांची उपासमार होऊ नये म्हणून तळेगाव दाभाडे येथील उद्योजक किशोर आवारे यांच्या संकल्पनेतून सुमारे चार हजार गरजू कुटुंबांना पुढील एक महिना पुरेल इतके धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. प्रारंभी दोन हजार कुटुंबांसाठी हा उपक्रम राबविण्यात होता, मात्र ऐनवेळी त्याची व्याप्ती चार हजार कुटुंबांपर्यंत वाढविण्यात आली. 

‘एक हात मदतीचा, संकल्प कोरोनामुक्तीचा’ हा संकल्प तडीस किशोर आवारे ह्यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमासाठी साधारणपणे 33 लाख रुपये खर्च झाला आहे.  अजूनही खर्चात वाढ झाली तरी आम्ही या गोरगरीबांसाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कमी पडू देणार नाही, असे तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश काकडे यांनी यावेळी सांगितले.

तमाशा कलाकार, रिक्षा चालक आणि मजूर,  ह्या सारख्या हातावर पोट असणाऱ्या लोकांना हा उपक्रम म्हणजे एक आधारच ठरत आहे. या सामाजिक उपक्रमात तळेगावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि विठ्ठल रुख्मिणी ट्रस्ट एकत्रितपणे ही सेवा करीत आहे.

नगरसेवक व प्रसिद्ध उद्योजक गणेश काकडे, उद्योजक संतोष अण्णा शेळके, सुनील पवार, माजी नगराध्यक्ष राजेंद्र  जांभूळकर, नगरसेवक निखिल भगत, रोहित लांघे, अनिल पवार, संतोष शिंदे, निलेश वारिंगे व मंडळातील सर्व कार्यकर्ते आदींचा ह्या कार्यात मोलाचा वाटा असून या गरीब बांधवांसाठी हे कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.