एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील मरीमाता मंडळ, तरुण ऐक्य मित्र मंडळ व संतोषभाऊ भेगडे स्पोर्टस् फाऊंडेशन यांच्यावतीने रोज दोनशे गरजू व्यक्तींना जेवणाचे पॅकेट घरपोच देण्याची व्यवस्था सुरू करण्यात आलेली आहे.  

 तळेगाव परिसरातील गोरगरीब गरजू व्यक्तींना अन्न पोहचविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने केलेल्या संचारबंदीमुळे अनेक छोट्या कंपन्यामधील कामगार, मजूर व यामध्ये सर्वात जास्त बिकट अवस्था नेहमी मोलमजुरी करून हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची झाली आहे. अशा लोकांना आपला उदरनिर्वाह करण्यासाठी सकाळी बाहेर पडावे लागते, पण अशा  कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे देशात सर्व ठिकाणी लॉकडाऊन चालू असल्याने सगळे काम आणि व्यवहार ठप्प झालेले आहे. त्यात अशा गरीब जनतेवर उपासमारीची वेळ आलेली आहे. अशातच समाजातील अनेक सामाजिक संस्था, उद्योजक आणि पोलीस कर्मचारीही अशा गरीब समाजातील जनतेला अन्नदान पुरविण्याचा कसोशीने  प्रयत्न करीत आहे.

संचारबंदीमुळे अनेक छोट्या कंपन्यामधील कामगार, मजूर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरजू लोकांवर उपासमारीची वेळ येऊ नये, या हेतूने अशाच परिस्थितीत मरिमाता मंडळ, तरूण ऐक्य मित्र मंडळ व संतोषभाऊ भेगडे स्पोर्टस् फाऊंडेशन आदींकडून गावभागातील गोरगरीब, मोलमजुरी करणा-या रोज दोनशे बांधवांना एकवेळी घरपोच जेवणाची पॅकेट देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. रविवार (दि 29) पासूनच जेवण पॅकेट वाटपाला सुरूवात केली आहे. अनेक स्वयंसेवक कार्यकर्ते आणि डॉक्टरांनी दिलेल्या सुरक्षिततेच्या नियमांची या अन्नदानात पालन केले जात आहे. स्वयंसेवक स्वतः मास्क, हातमोजे यांचा वापर करत आहेत. तसेच एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून गरीब, गरजू लोकांच्या वस्तीवर जाऊन कार्यकर्ते जेवणाची पॅकेट वाटप करीत आहेत.

या अन्नछत्रात दररोज दोनशे लोकांसाठी भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच अन्नदान करण्याबरोबर कोरोनाबाबत जनजागृती करण्याचे काम मंडळाचे कार्यकर्ते करत आहेत.  या उपक्रमामुळे या गरीब मजुरांकडून  समाधान व्यक्त केले जात आहे. तरी या कार्यास ज्या दानशूर व्यक्तींना  वस्तू रूपाने (गहू, तांदूळ, तेल, आटा, भाजीपाला व इतर)  हातभार लावायचा असेल तर अशा व्यक्तीनी खाली दिलेल्या क्रमांकांवर संपर्क करून वस्तूरूपाने मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क क्रमांक –

संतोष भेगडे – 9922901818

सोमनाथ भेगडे – 9921291243

अक्षय रानवडे – 8087444214

बाळासाहेब वाजे – 9822549400

धनराज माने – 7507757577

सिध्दार्थ भेगडे – 9860285747