Talegaon Dabhade : तळेगाव स्टेशन विभागातील गरीब नागरिकांसाठी मोफत अन्नछत्र

एमपीसी न्यूज : येथील इस्कॉन मंदिर, अन्नामृत संस्था आणि विश्व हिंदू परिषद,  बजरंग दलाच्या वतीने तळेगाव स्टेशन परिसरातील गोरगरीब गरजू व्यक्तींना अन्न पोहचविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यानुसार गरजू नागरिकांना दुपारी आणि रात्री मोफत जेवण देण्यात येणार आहे.

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. यामध्ये सर्वात जास्त बिकट अवस्था नेहमी मोलमजुरी करून हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची झाली आहे. त्यांना नेहमी संध्याकाळी पोट भरण्यासाठी सकाळी बाहेर निघावेच लागते पण आता कोरोना व्हायरसमुळे देशात सर्व ठिकाणी लॉकडाऊन चालू असल्याने सगळे काम आणि व्यवहार ठप्प झालेले आहे. त्यात अशा गरीब जनतेला दिवसभर अन्नाची चिंता सतावत आहे.

या पार्श्वभूमीवर सामाजिक संस्था, उद्योजक आणि पोलीस कर्मचारीही अशा गरीब समाजातील जनतेला दोन वेळचे अन्न पुरविण्याच्या प्रयत्नात आहे. इस्कॉन मंदिर, अन्नामृत संस्था आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने तळेगाव दाभाडे येथील स्टेशन परिसरातील ज्या ज्या नागरिकांना दोन वेळच्या जेवणाच्या समस्या आहे त्यांना दोन वेळचे मोफत जेवण अर्थात दुपारी व रात्री देण्याचे ठरविले आहे.

आज रविवार (दि. 29) सकाळी अकरापासून अन्नदान सुरू करण्यात आले आहे. रात्रीचे जेवण आठ वाजता दिले जाणार आहे. गरजू नागरिकांनी महेश पवार -९७६२२६२५२५, अमित पवार-७०४०५२८१६९, योगेश शेटे -7775858653, निलेश वारींगे- 9921315181 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.