Talegaon Dabhade : प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज- प्रजासत्ताक दिनानिमित्त तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. 40 जणांनी या शिबिराचा लाभ घेतला. 

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गावडे मॅडम, बेके मॅडम, मनकर्णिका महिला महासंघाच्या संस्थापिका वीणाताई करंडे, ज्योती सोनवणे, किर्ती गायकवाड, दीपाली थोरात, राधा बनकर व शारदा थोरात, ऑप्टिमम डायग्नोस्टिक सेंटरचे संस्थापक केदार येनपुरे, सौरभ चिंचवडे, शोभा डुंबरे, स्नेहा धुमाळ, मीनाक्षी प्रशांत वाबळे, युवराज वाघमारे धर्मदीप शिंदे, अक्षय बर्डे, रजत कुडाळ उपस्थित होते. ऑप्टिमम डायग्नोस्टिक सेंटरतर्फे बीपी, शुगर, एचबी, बीएमआई तपासण्या करण्यात आल्या.

वीणाताई करंडे यांनी कायदा व सुव्यवस्थेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस बंधू-भगिनींना कामाचा भरपूर ताण असतो या भावनेतून या शिबिराचे आयोजन केले असल्याचे सांगितले. तर अमरनाथ वाघमोडे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.