Talegaon Dabhade : शिक्षण समितीतर्फे नगरपालिकेच्या सर्व शिक्षकांची वैद्यकीय तपासणी

एमपीसी न्यूज- शिक्षक दिनानिमित्त आज, शुक्रवारी तळेगाव दाभाडे शिक्षण समितीतर्फे नगरपालिकेच्या सर्व शिक्षकांची वद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये नगरपालिकेच्या सात शाळांमधील सर्व शिक्षकांनी म्हणजे 65 जणांनी आपली वैद्यकीय तपासणी करून घेतली

शिक्षकदिन साजरा करताना त्यांना सन्मानाबरोबर त्यांच्या आरोग्याची पण काळजी घेणे महत्त्वाचे असते कारण पुढील भावी पिढी त्यांच्या हातून घडत असते त्यामुळे शिक्षक तंदुरुस्त असणे जरूरीचे आहे असे शिक्षण समितीच्या सभापती सौ कल्पना भोपळे यांनी सांगितले. मायमर मेडिकल कॉलेज व भाऊसाहेब सरदेसाई ट्रस्ट यांच्या साहाय्याने ही तपासणी करण्यात आली. त्यावेळी तेथील डॉक्टरांचे व स्टाफ चे सत्कार करण्यात आले.

या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, महिला बालकल्याण च्या सभापती प्राची हेंद्रे, काजल गटे, नागरसेविका शोभा भेगडे, विभावरी दाभाडे, संध्या भेगडे, शिक्षक समितीच्या सदस्या नीता काळोखे व सुरेश दाभाडे, प्रशासन अधिकारी गावडे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल नांगरे मॅडम व त्यांच्या सर्व स्टाफचे आभार मानण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.