Talegaon Dabhade : फ्रेन्ड्स ऑफ नेचर संस्थेकडून लिंब फाटा येथे सीसीटीव्ही बसवून राखले सामाजिक भान

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या (Talegaon Dabhade) विनंतीस मान देऊन व सामाजिक बांधिलकीचे भान ठेऊन, फ्रेन्ड्स ऑफ नेचर या संस्थेने लिंब फाटा येथे उच्च दर्जाचे सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवले आहेत.

हे कॅमेरे स्वतंत्र एफ.टी. टी.एच (FTTH ) इंटरनेटच्या माध्यमातून पोलिस स्टेशन येथील कंट्रोल रुमला जोडलेले आहेत. या ठिकाणच्या 12 दिवसाआधीचे कोणतेही फुटेज पोलिस तत्काळ पाहू शकणार आहेत.

इतकेच नव्हे तर काही पोलिस अधिकाऱ्यांच्या मोबाईलवरही याचे कनेक्शन दिलेले आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण वरिष्ठ पोलिस निरीक्षक जवदवाड यांच्या हस्ते होणार होते, परंतु त्यांना अचानक कमिशनर ऑफिसमध्ये जावे लागल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत.

हे लोकार्पण आज दुपारी 2 वाजता पोलिस हवालदार सुनील तळपे, पोलिस नाईक प्रशांत वाबळे, महिला पोलिस नाईक वैशाली बोरकर, कॉन्स्टेबल बाबाराजे मुंडे यांच्या उपस्थितीत श्रीफळ अर्पण करून करण्यात आले. या प्रसंगी फ्रेन्ड्स ऑफ नेचरचे अध्यक्ष निरज शाही, संस्थापक अध्यक्ष महेश महाजन, माजी अध्यक्ष विवेक रामायणे, निशिकांत पंचवाघ, सुधाकर मोरे, दिपक शिरसाठ, राकेश बागुल, किरण मोकाशी व इतर सदस्य उपस्थित होते.

Pimpri News : शहरात 98 टक्के ओला व सुका कचऱ्याचे विलगीकरण; पालिकेचा दावा

पोलिस अधिकारी प्रशांत वाबळे यांनी या (Talegaon Dabhade) कॅमेर्‍यामुळे अपघाताचा छडा लावणे व साखळी चोरांचा तपास करणे सुलभ होईल असे सांगून फ्रेन्ड्स ऑफ नेचर या संस्थेचे आभार मानले. महेश महाजन यांनी याची सर्व देखभाल नियमीतपणे केली जाईल व मासिक इंटरनेटचा खर्चही संस्थेकडूनच केला जाईल, असे सांगितले.

2023 हे फ्रेन्ड्स ऑफ नेचर या संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या वर्षात आशेचे विविध सामाजिक आणि निसर्ग संवर्धनाचे विविध उपक्रम केले जाणार आहेत, असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेश महाजन यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.