BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : ‘गंध द स्मेल’ नाटकाने रसिकांसमोर सुगंध पसरवला

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- रंगभूमी मुंबई क्रियेशनस प्रस्तुत गंध द स्मेल या नाटकाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सामान्य आयुष्य जगत असताना आपल्या आयुष्यात गंध किती म्हहत्वाचा असतो त्याला किती छटा असतात त्या सर्व छटा प्रभावीरित्या या नाटकात मांडल्या गेल्या आहेत. नुकताच पुण्यातील सुदर्शन नाट्यगृहात या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला.

या नाटकात तीन कथा आपल्या समोर येतात ज्यामध्ये कधी आपण शाळेच्या आठवणींमध्ये रममाण होतो तर कधी निराशेच्या गर्तेत असताना आशेचा किरण बनुन आपल्याला आयुष्य नव्याने जगायला उर्जा देणारा हाच गंध असतो .तर कधी खुप विचित्र असा आपल्याला न आवडणारा गंध आपल्याला जाणवतो. काही जणांना असेच विचित्र गंध आपल्याकडे आकर्षित करत असतात. तीच गोष्ट स्त्री पुरुषांच्या नात्याला अजुनच जटील करुन गेली तर ? तीच गंध पाहाणार्‍याला थरारुन सोडते.

या तिन्ही कथांपैकी पहिली कथा सुप्रसिध्द लेखिका समता सागर यांनी लिहिली आहे तर इतर दोन कथा या हर्षल आल्पे यांनी लिहिलेल्या आहेत. नाटकाचे दिग्दर्शन मनीष शिर्के यांचे असून सुप्रसिध्द अभिनेते जयंत गाडेकर आणि गितिका श्याम यांनी आपल्या भूमिका सुरेख सादर केल्या आहेत. तीनही कथांचा बाज वेगळा असल्याने त्यांच्या भूमिका प्रभावशाली वठल्या आहेत. एकुणच हे नाटक पाहुन रसिकांना एका वेगळ्याच सुंगंधाचा अनुभव देते.

HB_POST_END_FTR-A4

.