Talegaon Dabhade : राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयाच्या गणेश बोऱ्हाडेला सुवर्ण पदक

एमपीसी न्यूज – इंद्रायणी महाविद्यालयाचा खेळाडू गणेश मंगेश बोऱ्हाडे याने सोनेरी कामगिरी केली. सांगली येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत 19 वर्ष वयोगटामध्ये 73 किलो खालील वजनी गटात एकूण 227 किलो वजन उचलत त्याने सुवर्णपदक (Talegaon Dabhade) मिळविले. या यशाबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
जिल्हा क्रिडा संकुल सांगली येथे 28 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाचा इयत्ता अकरावी मधील खेळाडू गणेश मंगेश बोऱ्हाडे याने 19 वर्ष वयोगटामध्ये 73 किलो खालील वजनी गटात सहभाग घेतला. त्याने स्नॅच 97 किलो व क्लीन अँड जर्क 130 किलो असे एकूण 227 किलो वजन उचलून प्रथम क्रमांक (सुवर्ण पदक)मिळविला.

या सुवर्णमय यशाबद्दल इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, संस्थेचे विश्वस्त मंडळ, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे, उपप्राचार्य प्रा.ए.आर.जाधव, शारीरिक शिक्षण संचालिका प्रतिभा गाडेकर व मार्गदर्शक बिहारीलाल दुबे, नितीन म्हाळसकर (Talegaon Dabhade) यांनी विशेष कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.