Talegaon Dabhade: कोरोनामुळे गणेशमुर्ती निर्मिती व्यवसाय संकटात

Talegaon Dabhade: Ganesh idol making business in crisis due to corona तळेगाव शहर परिसरात पारंपरिक पद्धतीने मूर्ती काम करणारी अनेक कुटुंबे आहेत.

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूमुळे गणेशमूर्ती निर्मितीचा व्यवसाय धोक्यात आला असला तरी स्थानिक मूर्ती बनविणारे कलाकार अतिशय परिश्रम घेऊन सहकुटुंब मूर्ती बनवण्याचे काम करत आहेत.

गणेशोत्सव येत्या 22 ऑगस्ट रोजी सुरू होत आहे. उत्सवासाठी लागणाऱ्या लहान, मोठ्या मूर्ती तयार करण्यावर यावर्षी प्रचंड संकट आले आहे. तळेगाव शहर परिसरात पारंपरिक पद्धतीने मूर्ती काम करणारी अनेक कुटुंबे आहेत. या सर्व स्थानिक कलाकारांना कोरोना संकटाने व इतर अडचणीने बेजार केले आहे.

मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट आले असून एप्रिल, मे, जून, जुलै या महिन्यातील लॉकडाऊन आणि बंदमुळे स्थानिक गणपती निर्मितीचे कारखाने बंद होते. घरातील प्रमुख मंडळी यांना बरोबर घेऊन मूर्तिकाम केले जात आहे.

मूर्तीच्या कारखान्यात काम करणारे कलाकार लॉकडाऊनमुळे येऊ न शकल्याने परिसरातील सहकाऱ्यांना बरोबर घेऊन गणेश मूर्ती पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेत असल्याचे स्थानिक मूर्तिकार विठ्ठल दरेकर (कुंभार) यांनी सांगितले.

तळेगाव शहरात योगेश कार्लेकर, पांडुरंग कार्लेकर, संभाजी कुंभार, मारुती दरेकर, चंद्रकांत कुंभार आदी स्थानिक कलाकार आपापल्या घरात मूर्ती बनविण्याचे काम पारंपारिक पद्धतीने दरवर्षी करतात. या वेळी कोरोनाच्या संकटामुळे अडचण निर्माण झालेली असून सध्या 90 टक्के पर्यंत मूर्तिकाम झाले असल्याचे स्थानिक कलाकारांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.