Talegaon Dabhade: गणेश काकडे मित्र परिवारकडून पोलिसांना ‘सॅनिटायझर, मास्क’चे वाटप

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनमध्ये सर्व नागरिक घरी असताना आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उभे राहून नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणा-या तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील कर्मचा-यांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप करण्यात आले. नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांच्यातर्फे हे सुरक्षिततेचे साहित्य पोलीस बांधवांना आज (मंगळवारी) देण्यात आले.

विरोधी पक्षनेते गणेश काकडे म्हणाले, ”कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन आहे. त्यामुळे नागरिक घरी बसून आहेत. पोलीस बांधव मात्र, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वत:च्या आयुष्याची पर्वा न करता रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य बजावत आहेत. आपली काळजी घेत आहेत. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये”, असे आवाहन काकडे यांनी केले.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात 140 कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचा-यांना विरोधी पक्षनेते काकडे यांच्यातर्फे सॅनिटायझर, मास्क देण्यात आले. यावेळी गणेश काकडे मित्र परिवाराचे पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.