BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी गणेश काकडे, रवींद्र आवारे, सुरेश दाभाडे यांची निवड निश्चित

उद्या होणार विशेष सभेत; तीन जागांसाठी तीनच उमेदवारी अर्ज दाखल

0
INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी नगरपरिषद सभागृहात बुधवारी (दि.14) दुपारी दोन वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहेत. तसेच तीन जागांसाठी तीनच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवडीची घोषणा केवळ बाकी आहे. त्यामुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी गणेश काकडे, रवींद्र आवारे, सुरेश दाभाडे यांची निवड निश्चित मानली जात आहे.

नगराध्यक्षा चित्रा जगनाडे निवडणूक तथा पिठासीन अधिकारी म्हणून काम पहात आहेत. नगरपरिषदेत भाजपा,जनसेवा विकास समिती आणि आरपीआय युतीची सत्ता आहे. तीन जागांसाठी नामनिर्देशित सदस्यांच्या बिनविरोध निवडीच्या घोषणेची आता फक्त औपचारिकता बाकी आहे. बुधवारी होणाऱ्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीमुळे रवींद्र आवारे आणि सुरेश दाभाडे या दोन माजी शिक्षण मंडळ सभापतींची नगरसेवक पदावर वर्णी लागणार आहे.

  • युतीचे स्वीकृत सदस्य अ‍ॅड. श्रीराम कुबेर, सुनील कारंडे आणि तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे सदस्य आनंद भेगडे यांनी 15 जुलै रोजी पदाचे राजीनामे जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होत आहे. तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांनी तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीच्या वतीने गुरुवारी (दि.8) आपला अर्ज सादर केला.

तळेगाव नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती सुरेश दाभाडे यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने तर, तळेगाव नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती, शहर भाजपाचे कार्याध्यक्ष रवींद्र आवारे यांनी जनसेवा विकास समितीच्या वतीने मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. छानणीत तीनही अर्ज वैध ठरले आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा मावळचे प्रांत सुभाष भागडे यांनी दिली.

HB_POST_END_FTR-A2

.