Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी गणेश काकडे

एमपीसी न्यूज- तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश काकडे यांची तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

काकडे हे श्री सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष, अखिल भारतीय नाट्य परिषद तळेगाव दाभाडेचे कार्याध्यक्ष असून रोटरी क्लब आॅफ तळेगाव एमआयडीसीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक,सहकार व अध्यात्मिक अशा विविध क्षेत्रात संबंधित असून त्यांचा सहभाग मोठा आहे.

गणेश काकडे यांचा सत्कार आमदार सुनील शेळके, माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे, उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, नगरसेवक गणेश खांडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक झिंजाड आदींनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like