Talegaon Dabhade : श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची गुरुवारी सर्वसाधारण सभा

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि.29) सायंकाळी पाच वाजता इशा हॉटेल येथे होणार आहे. या सर्वसाधारण सभेमध्ये पुणे पीपल्स बँकेचे नवनिर्वाचित संचालक यांचा सन्मान करण्यात येणार असून संस्थेचे संस्थापक बबनराव भेगडे यांना ‘सहकारभूषण’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक संस्थेचे अध्यक्ष राहुल पारगे व पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य आणि नगरसेवक संतोष भेगडे यांनी दिली.

पानिपतकर डॉ. विश्वास पाटील हे प्रमुख वक्ते असतील. राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार, सहकारभूषण बबनराव भेगडे यांच्यासह माजी राज्यमंत्री मदन बाफना, संजय भेगडे, आमदार सुनील शेळके, पुणे पीपल्स बँकेचे अध्यक्ष ॲड. सुभाष मोहिते, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक ज्ञानेश्वर तथा माऊली दाभाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Chakan : चाकणमध्ये पोलीस बंदोबस्तात करवाढ हरकतींवर सुनावणीस सुरुवात

यांच्यासह इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, मावळ तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश खांडगे,पुणे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाबुराव वायकर, देहूच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव, मावळ भाजपचे अध्यक्ष रवींद्र भेगडे, यादवेंद्र खळदे, कृष्णा कारके, अशोक बाफना, सुरेश धोत्रे, बबनराव भोंगाडे, विठ्ठलराव शिंदे, गणेश काकडे, रवींद्रनाथ दाभाडे, मयूर ढोरे, सुरेश साखवळकर, दिपाली गराडे, किशोर सातकर आदी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास जास्तीत जास्त  (Talegaon Dabhade) संख्येने नागरिक व मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती देखील कार्यक्रमाचे निमंत्रक संस्थेचे अध्यक्ष राहुल पारगे व संचालक तसेच नगरसेवक संतोष भेगडे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.