Talegaon Dabhade : श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीच्या अध्यक्षपदी गोकुळ भेगडे तर खजिनदारपदी प्रणव भेगडे

एमपीसी न्यूज – श्री डोळसनाथ महाराज उत्सव पुणे जिल्ह्यात नावाजलेला एक उत्सव तळेगाव दाभाडे येथे होतो. त्याच्या अध्यक्षपदासाठी शनिवारी (दि. 22) यावेळी निवडणूक घेण्यात आली. यावेळी गोकुळ अनिल भेगडे यांची बिनविरोध अध्यक्ष पदासाठी निवड झाली. तर खजिनदार पदासाठी प्रणव मारुती भेगडे यांची निवड करण्यात आली. तसेच सरचिटणीसपदी निरंजन भेगडे यांची निवड करण्यात आली.

डोळसनाथ महाराज उत्सव समितीचे अध्यक्ष निवड करतेवेळेस, माजी मंत्री संजय (बाळा) भेगडे, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश किसन भेगडे, डोळसनाथ समितीचे माननीय माजी अध्यक्ष सोमाभाऊ अनिल भेगडे, संतोष किसन भेगडे, माजी अध्यक्ष डोळसनाथ उत्सव समिती अजिंक्य (चिंकु ) सातकर, इतर मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.