Talegaon Dabhade : प्रमोद महाजन यांच्या पुण्यतिथीनिमित्त बाळा भेगडे यांनी केले अभिवादन

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते स्वर्गिय प्रमोद महाजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांनी अभिवादन केले आहे. दिवंगत प्रमोद महाजन यांचे आज (रविवार) 14 वे पुण्यस्मरण आहे.

तळेगाव दाभाडे येथील भाजपा पक्ष कार्यालयात पार पडलेल्या समारंभाला, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, शहराध्यक्ष रविंद्र माने, कार्याध्यक्ष महेंद्र पळसे, माजी तालुका अध्यक्ष प्रशांत ढोरे, भाजयुमो तालुका अध्यक्ष संदिप काकडे, खजिनदार सतिष राऊत, संघटनमंत्री सचिन टकले, सरचिटणीस विनायक भेगडे, रवि साबळे, भाजयुमो अध्यक्ष अक्षय भेगडे, अनु.जा.आघाडी अध्यक्ष सुनिल कांबळे, ओबीसी आघाडी कार्याध्यक्ष सचिन जाधव, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष शुभम कुल आदि उपस्थित होते.

छोटेखानी पार पडलेल्या समारंभासाठी मोजकेच लोक उपस्थित होते तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यालयांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले होते तसेच कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही, याची काळजी घेतली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.