Talegaon Dabhade: आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी हर्षवर्धन काकडे ‘शारजा’ला रवाना

एमपीसी न्यूज – दुबईमध्ये शारजा येथे होत असलेल्या इंटरनॅशनल स्कूल क्रिकेट टूर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी हर्षवर्धन संग्राम काकडे रवाना झाला. तळेगाव दाभाडेचे उपनगराध्यक्ष संग्राम काकडे यांचा तो मुलगा आहे.

हर्षवर्धन हा 14 वर्षीय क्रिकेटपटू आंबी येथील डी. वाय. पाटील स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकतो. या स्पर्धेसाठी मावळतून या एकमेव खेळाडूची निवड झाली आहे. पुणे येथील बिशप स्कूलतर्फे खेळायची संधी त्याला मिळाली आहे. या स्पर्धेसाठी भारतामधून तीन संघ शारजा येथे जात आहेत.

या आधी हर्षवर्धनने पुण्याच्या सीएनएन क्रिकेट अकॅडमीतर्फे 14 वर्षाखालील संघामध्ये आपली कामगिरी दाखविली आहे.याबाबत त्याचे मावळ तालुक्यातून कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.