Talegaon Dabhade : सांगली व कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी डॉ. डी.वाय.पाटील एज्युकेशन फेडरेशनची मदत

एमपीसी न्यूज- सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना डॉ .डी. वाय.पाटील एज्युकेशन फेडरेशनतर्फे वस्तू व देणगी रूपात मदत करण्यात आली.

डॉ .डी. वाय.पाटील एज्युकेशन फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. सुशांत पाटील, संस्थेचे चारही विभाग डॉ. डी. वाय पाटील इंजिनिरिंग कॉलेज, डॉ. डी. वाय पाटील मॅनेजमेंट कॉलेज, डॉ.डी.वाय. पाटील ज्युनिअर कॉलेज सायन्स, डॉ. डी. वाय पाटील एक्सलेन्स स्कूल सीबीएसई यांच्यातर्फे १५ ऑगस्ट रोजी सांगली व कोल्हापूर येथील पूरग्रस्तांनासाठी वस्तू व देणगी रूपात मदत करण्यात आली. संस्थेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थिनी यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. अॅड. अनुजा सुशांत पाटील, डॉ. सुनील इंगोले, डॉ. सोनल पाटील, डॉ. राजवर्धन एंडी यावेळी उपस्थित होते. संस्थेचे कर्मचारी मदत स्वहस्ते पुरग्रस्तांना वाटप करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.