Talegaon Dabhade : तळेगावात रविवारपासून रंगणार हिंदमाता व्याख्यानमाला

एमपीसी न्यूज- हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्था आणि कै. रोहित रवींद्रनाथ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विदयमाने तीन दिवसीय हिंदमाता व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान तळेगाव स्टेशनच्या नाना भालेराव कॉलनीतील सेवाधाम ग्रंथालयाच्या आवारात दररोज संध्याकाळी 6 वाजता ही व्याख्यानमाला रंगणार आहे. अशी माहिती मुख्य संयोजक तथा पतसंस्थेचे संस्थापक अॅड रवींद्रनाथ दाभाडे आणि संस्थेचे सचिव कैलास भेगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी माजी नगराध्यक्ष अॅड विश्वनाथ दाभाडे, पतसंस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ दाभाडे, संचालक सुधाकर देशमुख, राजेश सरोदे, प्रदीप पवार, देवराम वाघोले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप गटे, व्यवस्थापक दत्तात्रय कांदळकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे हे असणार असून त्यांच्या हस्ते रविवारी (ता.9) सायंकाळी 6 वाजता व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर “नागरिकत्व संशोधन कायदा व राष्ट्रीय सुरक्षा ” या विषयावर प्रशांत दिवेकर यांचे व्याख्यान होईल. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक निखील भगत उपस्थित राहणार आहेत.

सोमवारी (ता.10) अहमदनगर येथील प्रसिद्ध लेखक डाॅ. संजय कळमकर यांचे ‘स्वामी विवेकानंद आणि आपण’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तळेगाव दाभाडे सिटी रोटरी क्लबचे अध्यक्ष मनोज ढमाले तर प्रमुख पाहुणे म्हणून तळेगाव दाभाडे लायन्स क्लबचे अध्यक्ष अॅड श्रीराम कुबेर हे उपस्थित राहणार आहेत.

मंगळवारी (ता.11) सद्गुरू वामनराव पै.यांचे शिष्य चंद्रकांत निंबाळकर यांच्या ‘सुख म्हणजे काय ?’ या विषयावरील व्याख्यानाने सांगता होईल. अध्यक्षस्थानी जीवन विद्या मिशन परिवाराचे गंगाराम गीते तर प्रमुख पाहुणे म्हणून तळेगाव शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर दाभाडे हे हे उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान आयर्न मॅन पुरस्कार विजेते तळेगाव दाभाडे येथील विशाल चंद्रकांत शेटे, वडगाव मावळ येथील खेलो इंडिया स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेती कु हर्षदा गरूड व वडगाव मावळ येथील खेलो इंडिया स्पर्धेतील ब्राँझ पदक विजेती कु रूचिका ढोरे व किशोरी लांडगे (कुस्ती) या चार खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

व्याख्यानमालेचा लाभ घेऊन मान्यवरांचे विचार ऐकावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.