Talegaon Dabhade : गणेशोत्सव सजावट स्पर्धेत हिंदुराज गणेश मंडळाने पटकावला मानाचा ‘गणराया ॲवार्ड 2019’

एमपीसी न्यूज- यंदा झालेल्या गणेशोत्सव सजावट स्पर्धेमध्ये मानाचा ‘गणराया ॲवार्ड 2019’पुरस्कार हिंदुराज गणेश मंडळाने पटकावला तर ‘लोकमान्य टिळक पुरस्कार’जय बजरंग तरूण मंडळाला तर ‘लोकसेवा पुरस्कार’ श्री छत्रपती मित्र मंडळाला मिळाला. राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली.

पारितोषिक वितरण प्रसंगी अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा भाजप अध्यक्ष गणेश भेगडे होते. यावेळी तालुका अध्यक्ष प्रशांत ढोरे, सभापती गुलाबराव म्हाळसकर, मावळ तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, भाजपा तळेगांव शहर कार्याध्यक्ष वैभव कोतुळकर, महिला आघाडी अध्यक्षा अलका भास्कर, कार्यध्यक्षा अंजली जोगळेकर, चारूशिला काटे, रजनीताई ठाकू,र नगरसेवक अरूण भेगडे पाटील, सचिन टकले, नगरसेविका शोभा भेगडे, संध्या भेगडे, मंगल जाधव, प्राची हेंद्रे, काजल गटे आदी उपस्थित होते.

कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली तर आकाशाला गवसणी घालण्याचे बळ त्यांना मिळते. असे मत राज्यमंत्री संजय भेगडे यांनी व्यक्त केले. युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय भेगडे यांनी प्रास्तविक केले. परीक्षक म्हणुन ॲड संतोष गराडे यांनी काम पाहिले. सतीश गराडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्याध्यक्ष प्रशांत दाभाडे यांनी आभार मानले.

सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे-

जिवंत देखावा – 1.कान्होबा मित्र मंडळ ,2.राष्ट्रतेज तरूण मंडळ 3.सरसेनापती उमाबाई दाभाडे गणेश मंडळ,
हलता देखावा – 1. विशाल मित्र मंडळ 2. फ्रेंड्स क्लब मित्र मंडळ 3. मुरलीधर मंडळ –
उत्कृष्ठ सजावट – विवेकानंद मित्र मंडळ, उत्त्कृष्ट ढोल-ताशा पुरस्कार – चावडी चौक तरूण मंडळ,
उत्कृष्ठ ढोल वादक- पुरुष – शिवानंदकुमार पाटील, महिला – प्रगती टेकावडे,
उत्कृष्ठ ताशा वादक -आदेश ओव्हाळ ,आकाश गरूड, उत्कृष्ठ मूर्तिकार -संजय दाभाडे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like