BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : जेवण वाढण्यासाठी उशीर केला म्हणून पत्नीस दगडाने मारहाण; पतीला अटक

0 774
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – जेवण वाढण्यासाठी उशीर केला म्हणून दारू प्यायलेल्या पतीने पत्नीला दगडाने मारहाण केली. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना बुधवारी (दि. 15) दुपारी दोनच्या सुमारास यशवंत नगर तळेगाव दाभाडे येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली.

श्रीकांत मनोज उपाध्ये (वय 23, रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी वीस वर्षे महिलेने तळेगाव पोलिसात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत बुधवारी दुपारी दारू पिऊन घरी आला. त्याने पत्नीला जेवण वाढण्यास सांगितले. पत्नीला जेवण वाढण्यासाठी उशीर झाला. यावरून श्रीकांत त्याने पत्नीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच घराबाहेर पडलेल्या दगडाने पत्नीला मारले. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. तळेगाव पोलिसांनी श्रीकांत याला अटक केली. तळेगाव दाभाडे पोलिस तपास करीत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3