Talegaon Dabhade :’लॉकडाऊन’मध्ये आम्ही पोलिसांचे ‘रट्टे’ खायला घरा’बाहेर’ येत नाही… कारण जाणून घ्या

एमपीसी न्यूज – सध्या ‘कोरोना’ विषाणूचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य शासानाने ‘लॉकडाऊन’ कालपासून जाहीर केले आहे. मात्र, हि, परिस्थिती भारत देशातील नागरिकांनी ओढविली नाही. हे जरी सत्य असले तरी, या देशातील अनेकांना घरा’बाहेर’ पडल्यावर पोलिसांचे ‘रट्टे’ खावे लागत आहेत. त्यामुळे आम्ही काय पोलिसांचे ‘रट्टे’ खायला घरा’बाहेर’ येत नाही, आम्ही कसे जगणार?, आमचे कारण जाणून घ्या. आम्हाला जगण्यासाठी आवश्यक वस्तूंचा पुरवठा करावा, अशी आर्त हाक पीडित नागरिक देत आहे.

‘लॉकडाऊन’ ची परिस्थिती भारत देशातील नागरिकांनी ओढविली नाही. याचा सारासार विचार करावा. तसेच मोलमजुरी करणारे, गोरगरीब यांचं या परिस्थितीत काय होणार?, कसे जगणार? याचा विचार कोण करत आहे का?. भारत हा विकसित नसून विकसनशील देश आहे. हे निर्णय घेणाऱ्या प्रत्येकाने जाणून घ्यावे. ‘लॉकडाऊन’च्या परिस्थितीत ‘जे’ लोक बाहेर पडत आहेत, त्यांना निदान कारण विचारायची तसदी पोलिसांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे मत पीडित नागरिक करीत आहेत.

आपल्या भारत देशात ही अभूतपूर्व परिस्थिती शेजारच्या देशांच्या अतिमूर्खपणामुळे उदभवली आहे. या दुर्दैवी, महामारी संकटाने अवघा देश बिथरला आहे. गरीब आणि श्रीमंतांची इथे खूप मोठी दरी आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता या प्रशासकीय यंत्रणेच्या कचाट्यात पिळून निघते आहे, असे चित्र स्पष्ट आहे.

उगीच उठ-सुठ लोकांना बडवून काय समाधान मिळणार? अधिकारी आणि कर्मचारी मंडळींना विसर पडला असावा की हे बाहेर देशातले नसून आपलेच आहेत. आधी विचारपूस करा. सत्यता पडताळून पाहायला तसेही आपले पोलीस हुशार आहेतच. अगदी दोन पेक्षा अधिक लोकं जरी एकत्र रोडवर दिसले तर खुशाल बडवा.

आता परिस्थितीकडे पाहताना आधी तीन दिवसाचा बंद, मग जमावबंदी, त्यापाठोपाठ 24 तासाचा ‘जनता कर्फ्यू’, लागलीच त्याला जोडून सलग 21 दिवसांचा कडेकोट बंद. बघा मार्च म्हणजे दुष्काळात तेरावा महिना… एकीकडे जवळ पैसे नाहीत, पगाराला काही दिवस बाकी आहेत. या ‘कोरोना’च्या बातम्या प्रसिद्ध व्हायला लागल्यावर जाणीवपूर्वक आर्थिक देवाण-घेवाण झालेली नाही. सर्व खासगी ठिकाणी काम करणा-यांना तर अ‍ॅडव्हान्स पण मिळालेला नाही. मग, हे सलग बंदचे दिवस मोजा आणि सांगा की लोकं बाहेर का पडत आहेत?, मार खायला, कि मरायला?

झालं.. आता काही खरं नाही… घरात खायला तर काहीच नाही… आणि खिशात पैसेही नाही….. उसनवारी कशी होणार?…. कोण कोणाला देणार?….. खरं तर त्या त्या विभागातील लोकं प्रतिनिधींनी पुढे येऊन जीवनावश्यक बाबीसाठी प्रशासन आणि जनता यामधला एक जनसेवक होण्याची गरज आहे. आश्वासन मोबाईलवर न देता प्रत्यक्ष उपाययोजना झाली पाहिजे, असे मत पीडित नागरिक व्यक्त करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.