Talegaon Dabhade : टाकवे बुद्रुक येथे निषेध मोर्चा; दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली

एमपीसी न्यूज -जम्मू काश्मिर येथील पुलवामा जिल्ह्यात राज्य राखीव दलाच्या सैनिक तुकडीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या ४४ भारतीय जवानांना टाकवे येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व बाळराजे इग्लिंश मिडीयम स्कुल आणि सरपंच चिधु मारुती असवले हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी पाकिस्तानच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत संपूर्ण गावातून प्रभातफेरी काढली. टाकवे येथील मुख्य चौकात झालेल्या निषेध सभेत सरपंच सुप्रिया मालपोटे असवले इंग्लिश स्कूल संस्थेचे अध्यक्ष शिवाजी असवले मुख्याध्यापक किरण हेंद्रे यांनी मनोगत व्यक्त केले. निवडणुकीत पाकिस्तानच्या विरोधात सरकारने कडक पाऊले उचलावीत, अशी मागणी आशी सर्वानी निषेध सभेत सर्वानी केली.

यावेळी उपस्थितीत अनिल मालपोटे, अनिल असवले, अविनाश असवले, स्वामी जगताप दत्ता घोजगे, नंदुशेठ असवले, काळुराम घोजगे, ऋषीनाथ शिंदे, विकास असवले, चंद्रकांत असवले, तानाजी असवले, किरण भांगरे, राम परदेशी, काळूराम घोजगे सुभाष बाफना, साहेबराव आंबेकर, सोमनाथ असवले, समिर असवले निखिल बांगरे पप्पू नाणेकर कैलास जगताप आदीजण उपस्थितीत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.