Talegaon Dabhade : बलुतेदार पतसंस्थेचे उद्या आमदार बाळा भेगडे यांच्या हस्ते उद्घाटन

नगराध्यक्षा तथा संस्थापक अध्यक्षा चित्रा जगनाडे यांची माहिती

एमपीसी न्यूज – पारंपरिक व्यवसायांसाठी विविध समाजातील वंचितांना मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि वित्तीय पुरवठा करण्याच्या उद्देशाने तळेगाव दाभाडे येथे बलुतेदार पतसंस्थेची स्थापना केली आहे. येत्या गुरूवारी (दि.30) आमदार बाळा भेगडे यांच्या हस्ते पतसंस्थेचे उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्षा तथा संस्थापक अध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी दिली. विशेष म्हणजे या पतसंस्थेवर सर्व संचालक महिला आहेत.

तळेगाव दाभाडे येथील तेली आळी चौकात सायंकाळी साडेसहा वाजता होणा-या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीरंग बारणे, अखिल भारतीय बुरूड समाजाचे विश्वस्त राजेंद्र सपकाळ, अखिल भारतीय तैलिक महासभेचे प्रांतिक विश्वस्त आणि राज्य ओबीसी आयोगाचे सदस्य भूषण कर्डिले, राज्य कुंभार महासभेचे विश्वस्त सुरेश हिरे, विश्वकर्मा प्रतिष्ठानचे संस्थापक कालिदास सोनवणे आणि माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे उपस्थित राहणार आहेत.

_MPC_DIR_MPU_II
  • यावेळी विविध समाजातील नामवंतांचा तसेच कर्तव्यतत्पर महिला संस्थांच्या प्रमुखांचा विशेष गौरव करण्यात येणार असून समारंभास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्षा जगनाडे यांनी केले आहे.

बलुतेदार महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या पहिल्या संचालक मंडळाच्या बैठकीत उपाध्यक्षपदी अनिता माने, सचिवपदी शुभांगी शिरसाट, सहसचिवपदी अश्विनी लोणकर तर खजिनदारपदी वैशाली राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कार्यकारिणीवर लक्ष्मी कोतूळकर, वैष्णवी टकले, मंगला जाधव, स्वाती पळसे, वर्षाराणी गुंड, सुनीता करपे, अर्चना खोंड, किरण परदेशी, मीनल फाकटकर, नयना दरेकर, रतन दळवी, उमा माने यांना संचालकपदी संधी देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.