Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयात कॉमर्स फेस्टिवलचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयातील (Talegaon Dabhade) वाणिज्य विभाग आयोजित ‘काॅमर्स फेस्टिवल 2023’चे उदघाटन प्रसिद्ध उद्योजक व इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांच्या हस्ते झाले.

या उदघाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन मास्क पाॅलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेश म्हस्के,संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे,सदस्या निरुपमा कानिटकर,सदस्य युवराज काकडे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस के मलघे, बी फार्मसीचे प्राचार्य डाॅ. संजय आरोटे, प्रा.आर आर भोसले ( धेंडे),इंद्रायणी महाविद्यालयाच्या कला व वाणिज्य शाखेचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Pune : लिंगाणा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकाचा खोल दरीत पडून मृत्यू

या प्रसंगी रामदास काकडे यांनी विद्यार्थांना उद्योजकते विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. आज जगातील उद्योग धंदे कंपन्या भारत देशाकडे चायना +1या दृष्टिकोनातून मोठ्या आशेने पहात असल्याने विद्यार्थ्यांना व्यवसाय व उद्योजकतेच्या असंख्य संधीची उदाहरणे त्यांनी विषद केली. स्पर्धेत यशस्वी होण्यासाठीचा कानमंत्र विद्यार्थांना दिला. विद्यार्थांनी खुप वाचन करावे,निरीक्षणातुन शिकावे, औद्योगिक सहली तसेच उद्योजकांची व्याख्याने,चरित्रे अभ्यासावीत असे आवाहन केले.

या प्रसंगी राजेश म्हस्के यांचे स्टार्टअप या विषयावर मार्गदर्शन उपस्थितांना लाभले. भारतात दरवर्षी 80 हजार (Talegaon Dabhade) स्टार्टअपची नोंदणी केली जाते व त्यामध्ये येणाऱ्या काळात भरीव वाढ होईल स्टार्टअप मध्ये यशाचे प्रमाण फक्त चार ते पाच टक्के असल्याने आठवीच्या विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी श्री म्हस्के हे तळेगावमध्ये स्टार्टअप इनक्युबॅशन सेंटर पुढील सहा महिन्यात सुरू करीत आहेत.

ग्राहकाची मानसिकता नवनवीन तंत्रज्ञानाचे शोध तसेच वित्त व्यवस्थापनाचा व मार्केटिंगचा अभाव इत्यादी समस्यांवर मात कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले व स्टार्टअप सुरू करणाऱ्यांना व्यक्तिगत मदत करण्याचे सांगितले.

या प्रसंगी प्राध्यापक डी पी काकडे साक्षी नाटक व भूमी तिवारी यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.