_MPC_DIR_MPU_III

Talegaon Dabhade : भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज- तळेगाव शहर परिसरात भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण, मानवंदना, प्रभातफेरी राष्ट्रगान तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण देशभक्तीपूर्ण बनले होते.

_MPC_DIR_MPU_IV

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यालयात नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे, तळेगाव शहर राष्ट्रवादी अध्यक्ष गणेश काकडे, महिला अध्यक्ष सुनीता काळोखे, भाजपा अध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, महिला आघाडी अध्यक्षा शोभा भेगडे, काँग्रेस अध्यक्ष यादवेंद्र खळदे, माजी नगराध्यक्ष सुरेश शहा, अॅड रवींद्र दाभाडे, उमाकांत कुलकर्णी, बाळासाहेब जांभूळकर, सुरेश चौधरी, राजेंद्र जांभूळकर, माया भेगडे, शालिनी खळदे, गटनेते सुशील सैदाणे, किशोर भेगडे, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांचेसह आजी माजी नगरसेवक, सर्व समिती सभापती, शिक्षण मंडळाचे माजी सभापती, उपसभापती विविध संस्थाचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तळेगाव शहर भाजपा कार्यालय येथे संतोष दाभाडे पाटील, तळेगाव शहर विकास समिती येथे माजी नगरसेवक गोपाळ परदेशी, सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये संस्थेचे अध्यक्ष बजरंग जाधव, राव कॉलनी प्रतिष्ठान येथे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, समर्थ विद्यालय येथे नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे, तलाठी कार्यालय येथे मंडल अधिकारी बजरंग मेकाले, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, आदर्श विद्यामंदिर येथे नगरसेविका हेमलता खळदे, सह्याद्री स्कूल येथे डॉ.गिरीश राठोड, जैन स्कूल येथे ख़ुशी रुपेश शहा, दीपक डांगी, अॅड पु.वा.परांजपे येथे उद्योजक मनोज ढमाले, इंद्रायणी महाविद्यालय येथे संचालक चंद्रकांत शेटे, नूतन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये माजी आमदार कृष्णराव भेगडे, तळेगाव जनरल रुग्णालयमध्ये डॉ.इश्वर झंवर, मामासाहेब खांडगे इंग्लिश स्कूल येथे अध्यक्ष गणेश खांडगे, पैसाफंड प्राथमिक शाळामध्ये संतोष शेळके,सरस्वती विद्या मंदिर येथे नगरसेवक संदीप शेळके, मेथाडीस्ट शाळेत नगरसेवक अरुण माने, बालविकास विद्यालयमध्ये माजी विद्यार्थिनी पल्लवी बाविसकर, तसेच नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, नगरसेवक अमोल शेटे, अरुण भेगडे पाटील, रोहित लांघे, मंगला जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने 73 वा स्वातंत्रदिनाचे ध्वजारोहन शिक्षणतज्ज्ञ, व्यावसायिक कामेश शहा यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी उपस्थित पालक, प्राध्यापक, विद्यार्थीना संबोधित करताना म्हणाले, यावेळी कमला इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भव्य संचलन करून उपस्थितांची मने जिंकली.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी प्रमुख पाहुणे उद्घाटन कामेश शहा, व्यवसायिक दीपक डागा, सुनिल शहा समवेत त्यांच्या सपत्नीक संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्रतिभा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, कमला शिक्षणशास्त्रच्या प्राचार्या पौर्णिमा कदम, एमबीएचे संचालक डॉ. सचिव बोरगावे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. वनिता कुर्‍हाडे, प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सविता ट्रॅव्हिस आदींनी संचलनप्रसंगी सलामी दिली.

प्रमुख पाहुणे शहा आदींच्या हस्ते गुणवंत क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळालेल्या विद्यार्थी, खेळाडूं समवेत पीएचडी, नेट, सेट अभ्यासक्रम पूर्ण केलेल्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, समाजप्रबोनात्मक नाटीका, नृत्य आदी कार्यक्रम सादर केले. त्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

प्रमुख पाहुणे व शिक्षणतज्ज्ञ कामेश शहा पुढे म्हणाले, “भारत देशाला विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविण्यासाठी युवा शक्तीमुळे शक्य होणार आहे. ती देशाची मुख्य ताकद आहे. युवा पिढीला घडविण्यासाठी शिक्षक पुढाकार घेत आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच जर्मन, जपानी आदी भाषेवर प्रभुत्व मिळवून आपला वेगळा ठसा उमटवावा. युवकांनी आपल्यामुळे इतरांना अडचण त्रास होणार नाही, याची खबरदारी घेत जे कार्य हाती घेतले आहे ते पूर्णत्त्वाला न्या, असे आवाहन केले.”

कमला शिक्षण संकूलाचे संस्थापक, सचिव डॉ. दीपक शहा म्हणाले, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात चमक दाखवत त्याच्या आवडीच्या क्षेत्रातही प्रगती करता यावी. यासाठी संस्था सतत नवनवीन उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. गेल्या वर्षी जाणता राजा नाटकात सुमारे 850 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्याच धर्तीवर चालू वर्षी देखील तशा प्रकारचा उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. उपस्थित पाहुण्यांचा परिचय व प्रस्तावना डॉ. कांकरीया, प्रा. सोनाली निकम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शबाना शेख यांनी तर आभार प्रा. अर्चना गांगड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिक सविता ट्रॅव्हिस, कार्यक्रम अधिकारी, प्रा. अरविंद बोरगे आदींनी विशेष परीश्रम घेतले.

 

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.