Talegaon Dabhade : स्वातंत्र्य दिनानिमित्त तळेगाव परिसरात राष्ट्रभक्ती रसाचा पुर

एमपीसी न्युज : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशाने साजरा केला. तळेगाव दाभाडे शहर आणि परिसरात देखील हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.(Talegaon-Dabhade) ध्वजारोहण, शोभायात्रा, चित्ररथ तसेच विविध सामाजिक उपक्रम आणि आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून तळेगावकर नागरिकांनी आपली देशभक्ती जागवली. नगरपरिषद कार्यालय, दाभाडे राजवाडा यांसह ठिकठिकाणी ध्वजारोहण झाले. हर घर तिरंगा या अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रभक्तीची मशाल घरोघरी पोहोचली.

 

तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयावर तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार सुनील शेळके, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे, आजी – माजी नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, शिक्षण मंडळाचे माजी सभापती, उपसभापती, समाजातील विविध संस्थावर असणारे पदाधिकारी व नागरिक  मोठ्या संख्येनी उपस्थित होते.या प्रसंगी पोलीस दलाकडून ध्वजास मानवंदना करण्यात आली.

Pimpri-Chinchwad: पिंपरी चिंचवड मधील 6 ट्रायथलिट यांनी कजाकिस्तान मध्ये रोवला मानाचा तुरा, आयर्न मॅन किताब पटकावला

तसेच शहरामध्ये विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. यामध्ये राजवाडा येथे सरसेनापती दाभाडे घराण्याचे वंशज श्रीमंत अंजलीराजे दाभाडे,श्रीमंत सत्येंद्रराजे दाभाडे व याज्ञीसेनीराजे दाभाडे यांच्या हस्ते, भारतीय जनता पक्षाच्या वतीने पक्ष कार्यालयावर शहराध्यक्ष रविंद्र माने यांचे हस्ते, (Talegaon-Dabhade) जिजामाता चौकात तळेगाव शहर विकास समितीच्या वतीने माजी नगरसेवक बाबुलाल नालबंद यांचे हस्ते, तलाठी कार्यालयामध्ये मंडल अधिकारी बजरंग मेकाले यांच्या हस्ते,सरसेनापती उमाबाई दाभाडे पतसंस्थेमध्ये चेअरमन बजरंग जाधव यांचे हस्ते तर राव कॉलनी प्रतिष्ठान येथे दत्तात्रय मेढी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या सर्व ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते, संस्थांचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

तसेच शैक्षणिक संस्थामधून इंद्रायणी विद्या मंदिर येथे उद्योजक नितीन मित्तल यांच्या हस्ते,कृष्णराव भेगडे इंग्लिश स्कूल येथे लायन्स क्लबचे अध्यक्ष मयूर राजगुरू यांच्या हस्ते, सह्याद्री इंग्लिश स्कूल येथे लेफ्टनंट ऋषीकेश खांडगे,जैन इंग्लिश स्कूल येथे दहावी मध्ये प्रथम क्रमांकाने पास झालेली जिया तुषार गादिया यांच्या हस्ते, समर्थ विद्या मंदिर येथे माजी सभापती बिजेंद्र किल्लावाला यांचे हस्ते, अँड पु. वा.परांजपे विद्या मंदिर येथे प्राध्यापक वसंत पवार यांच्या हस्ते, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे नूतन कॉलेज ऑफ इंजीनिरिंग अंड रिसर्च मध्ये उद्योजक सागर शिंदे यांच्या हस्ते, मामासाहेब खांडगे इंग्लिश स्कूल येथे आदित्य खांडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.(Talegaon-Dabhade) तसेच तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सर्व शाळामध्ये प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यासर्व ठिकाणी ध्वजारोहणच्या कार्यक्रमास संस्थाचे अध्यक्ष, पदाधिकारी, विश्वस्त, मुख्याध्यपक,शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.