Talegaon Dabhade : इंद्रायणी बी फार्मसी महाविद्यालयाच्या गुणवत्तेचा चढता आलेख

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्था संचलित इंद्रायणी इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (बी फार्मसी) महाविद्यालयामध्ये नुकताच तृतीय वर्षाचा विद्यार्थी व पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला. बी फार्मसी महाविद्यालयाच्या गुणवत्तेचा आलेख उंचावत असून विद्यार्थ्यांच्या प्रगतीमधून तो दिसून येत असल्याच्या भावना , यावेळी पालक वर्गाने (Talegaon Dabhade news) व्यक्त केल्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय आरोटे यांनी महाविद्यालयाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती पालकांसमोर सादर केली. या कार्यक्रमाला इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या सदस्य व उद्योजिका निरुपा कानिटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय आरोटे यांनी यांनी केले. त्यामध्ये त्यांनी महाविद्यालयामार्फत राबवण्यात आलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती पालकांना दिली. नियमित तासिका तसेच विविध सेमिनार, तसेच विद्यापीठ परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशाचा आलेख पालकांसमोर प्रस्तुत केला.
अॅकॅडमिक डीन प्रा. गणेश म्हस्के यांनी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकासाचा आलेख पालकांसमोर मांडला. तसेच महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी करत असलेल्या कामाची माहिती दिली.निरुपा कानिटकर यांनी या मेळाव्याला संबोधित करतांना पालकांचे स्वागत केले व पालकांनी आपल्या पाल्यांचा नियमित शैक्षणिक आढावा घेतला पाहिजे ,असे सांगितले .

तसेच संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे ,हे नमूद केले. पालकांनीही आपले मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाकडून प्रत्येक  विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष दिल्याचे निदर्शनास आल्याचे सांगून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर (Talegaon Dabhade news) समाधान व्यक्त केले.
या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते. सर्वांचे स्वागत प्रा. पूजा कुंभार यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मयुरी गुरव  तसेच आभार डॉ. योगेश झांबरे यांनी मानले. सर्व कार्यक्रमाच्या शिस्तबद्ध आयोजनासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, कोषाध्यक्ष शैलेश शहा, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.